Enter your Email Address to subscribe to our newsletters
ऑगस्ट 1 भारताच्या आर्थिक स्तरावरील डिजीटल सेवांमध्ये बदल होत आहेत, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे सुरु होणाऱ्या पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआय नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हे नवीन नियम आणले आहेत.
पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे सचिन हा मूळचा एका शेतकरी कुटुंबातील. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात काही वर्षं मुंबईत घालवली, पण त्यांच्या मनात मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न होतं. गावातच काहीतरी उद्योग करायचा असं त्यांनी ठरवलं होतं.
काळाच्या पुढे जाण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कामाचा आराखडा तयार करणे, आपल्याबरोबर समाजाला नवी दिशा देत, तंत्रकुशल नेतृत्व म्हणून स्वत:ला सिध्द करत, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर.
प्रवास हा केवळ स्थळ बदल नाही, तर नव्या स्वप्नांची, नव्या अनुभवांची सुरुवात आहे. जग पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही एक सुंदर संधी आहे. आणि या प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यावर, जनता सहकारी बँक तुमच्या सोबत आहे!
आजच्या डिजिटल युगात तरुणांनी केवळ करिअरमध्येच नव्हे, तर आर्थिक क्षेत्रातही सजग राहणं गरजेचं आहे. वेळेवर घेतलेले बचतीचे निर्णय आणि योग्य नियोजन तुम्हाला भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळवून देतात. यामध्ये भारतीय सहकारी बँकिंग प्रणाली एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो.