बॅग भरा आणि आपल्या मनातील सहलीचे ठिकाण निवडा…

प्रवास करा... जनता बँकेच्या सोबतीने!

JSB Financial Blog    18-Apr-2025
|
 
Travelling
 
प्रवास हा केवळ स्थळ बदल नाही, तर नव्या स्वप्नांची, नव्या अनुभवांची सुरुवात आहे. जग पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही एक सुंदर संधी आहे. आणि या प्रत्येक प्रवासाच्या टप्प्यावर, जनता सहकारी बँक तुमच्या सोबत आहे!
 
सुनितीने जनता सहकारी बँकेच्या पर्यटन कर्ज योजनेचा लाभ घेतला. तीचे आई-बाबा आणि आजीला घेऊन छान सफर करायची असे सुनितीने ठरवले होते. त्याप्रमाणे
- प्रवासाचे नियोजन केले – रेल्वेची तिकीटे, आजीला त्रास होऊ नये यासाठी काही ठिकाणी फ्लाईटचे बुकिंग, ज्या ठिकाणी जाणार आहोत तेथील स्थानिक पर्यटनासाठी चारचाकी गाडीची व्यवस्था, राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असे सर्व नियोजन सुनितीने केले.
 
- जनता बँकेचे डाऊनलोड केलेले ॲप अपडेट आहे ना याची खात्री करुन घेतली. प्रवासात पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर होणार होता, त्यामुळे बँक खात्यात पुरेसे पैसे आहेत ना याची खात्री करुन सुनिती आणि तीचे कुटुंबिय यात्रेला निघाले.
 
का करावा प्रवास?
प्रवास आपल्याला केवळ नवीन ठिकाणं दाखवत नाही, तर नव्या संस्कृती, विविध चव, लोकांची भाषा, जीवनशैली यांच्याशी आपली ओळख करून देतो. तो आपल्यात नवे विचार जागवतो, नवीन ऊर्जा भरतो आणि आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण करतो.
 
प्रवासासाठी आर्थिक नियोजन का गरजेचं आहे?
प्रवासाचा आनंद घेताना आर्थिक स्थिरता असणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य नियोजन केल्यास प्रवास अधिक आनंददायी होतो. यासाठीच जनता बँक तुमच्यासाठी विविध सेवा घेऊन आलं आहे:
✅ प्रवासासाठी वैयक्तिक कर्ज – कमी व्याजदरात आणि सोप्या कागदपत्रांसह.
✅ बचत खाती आणि आवर्ती ठेव योजना – प्रवासासाठी पूर्वतयारी म्हणून नियमित बचत.
✅ डिजिटल बँकिंग सुविधा – प्रवासादरम्यानही बँकिंग सहज आणि सुरक्षित.
✅ क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा – हॉटेल बुकिंग, शॉपिंग आणि तिकीट खरेदीला सोपे पर्याय.
 
जनता बँकेसोबत प्रवासाचे स्वप्न साकार करा!
आजच तुमचं प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक तयारी करा. कुठेही जा — उत्तुंग हिमालयात ट्रेक करा, शांत समुद्रकिनाऱ्यांवर विश्रांती घ्या, की ऐतिहासिक शहरं शोधा —
जनता बँक तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम तुमच्या पाठीशी आहे.
 
"जग पाहा, अनुभव जोडा, आठवणी गोळा करा... कारण शेवटी आयुष्य म्हणजे प्रवास!"