भार कमी करायचाय...UPI वापरकर्त्यांसाठी १ ऑगस्टपासून बदल

JSB Financial Blog    01-Aug-2025
|
UPi
ऑगस्ट 1 भारताच्या आर्थिक स्तरावरील डिजीटल सेवांमध्ये बदल होत आहेत, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे सुरु होणाऱ्या पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआय नियमांमध्ये काही बदल केले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून UPI वापरकर्त्यांसाठी मोठे बदल लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ला अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हे नवीन नियम आणले आहेत.
 
हे नियम कोणते याबाबत जाणून घेऊया -
 
१. आता तुम्ही UPI ॲपवरुन दिवसातून फक्त ५० वेळाच बँक खात्यातील शिल्लक तपासू शकतात. वारंवार बॅलन्स तपासल्याने सर्व्हरवर दबाव येतो. ज्यामुळे व्यवहारांना गती मिळत नाही.
 
२. तुम्ही मोबाईल नंबरवरुन दिवसातून फक्त २५ वेळा लिंक्ड बँक खाती तपासू शकाल.
 
३. या बदलांचा मुख्य उद्देश युपीआय प्रणालीवरील अनावश्यक भार कमी करणे, सर्वर स्थिर करणे आणि व्यवहार जलद व
अधिक सुरक्षित करणे हा आहे. तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेल्या बँक खात्यांची यादी तुम्ही एका दिवसात फक्त 25 वेळाच पाहू शकाल. यामुळे अनावश्यक API कॉल्स कमी होतील आणि युपीआय सेवा अधिक सुरळीत चालेल.
 
नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड एसआयपी किंवा इतर बिलांचे ऑटोपे व्यवहार आता फक्त वापरकर्त्यांच्या उपस्थिती कमी असलेल्या (नॉन-पीक) वेळेतच पूर्ण होतील. यासाठी तीन वेळा ठरवण्यात आल्या आहेत.
 
हे नियम GPay, PhonePe, Paytm सह सर्व UPI ॲप्स वापरणाऱ्यांवर लागू होतील. मात्र, जे सामान्यपणे UPI वापरतात आणि वारंवार बॅलन्स किंवा स्टेटस तपासत नाहीत, त्यांना कदाचित जास्त फरक जाणवणार नाही.
 
ऑटो पेमेंट्स
ऑटो पेमेंट्सद्वारे बँक ग्राहकांना वापरकर्त्यांच्या खात्यातून ठराविक रक्कम वारंवार डेबिट करण्याची परवानगी देतात.
मात्र, कधी कधी पैसे डेबीट करताना अँप्लिकेशन्स प्रोग्रामिंग इंटरफेस किंवा एपीआय प्रणालीवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे
एनपीसीआयने हे आदेश दिले आहेत की, अशा व्यवहारांची प्रक्रिया रात्री 10 वाजण्यापूर्वी 1 ते 5 या वेळेतच केली जाईल. म्हणजे जर सकाळी 11 वाजता ऑटोपे ची प्रक्रिया झाली नाही तर नियोजित वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर ती रक्कम कापली जाऊ शकते.
 
व्यवहार स्थिती
आर्थिक व्यवहार ज्या वेळेत जास्त होतात त्या काळांत व्यवहारखूप सामान्य असतात, जेव्हा ग्राहकांना असा अनुभव येतो की, पैसे पाठवणाऱ्याच्या खात्यातून पैसे कापले जातात, पण ज्याला ते पाठवलेत त्याला ते मिळत नाहीत. अशा केसमध्ये पेमेंट्सना, काही काळ प्रलंबित दाखवले जात असे मात्र आता ते काही सेकंदात अद्ययावत करण्यासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे. युजर्सला 90 सेकंदांच्या अंतराने केवळ 3 वेळा पेमेंट स्टेटस तपासता येईल.
 
प्राप्तकर्त्याची माहिती
प्रत्येक व्यवहारापूर्वी व्यवहार प्राप्तकर्त्याचे नाव प्रेषकाला दाखवले जाईल. हे फसवणूक टाळण्याचे किंवा चुकीच्या व्यक्‍तीला पैसे पाठवण्याचे प्रकार यामुळे टाळले जाऊ शकतात. यूपीआय अँपवरील व्यवहार आयडीसह प्राप्तकर्त्यांचे नोंदणीकृत नाव दाखवले जाईल. या मार्गदर्शक सूचनांचे पालन न झाल्यास एनपीसीआय यूपीआयवर निर्बंध आणू शकते, दंड, नवीन ग्राहकांचे निलंबन किंवा इतर कोणत्याही उपाययोजनांसह आवश्यक कारवाई केली जाऊ शकते. या नियमांमुळे एनपीसीआय ऑनलाइन पेमेंटची कार्यक्षमता वाढवणार असून, फसवणुकीची प्रकरणे कमी होतील. या नवीन नियमांसाठी ग्राहकांना काय करावे लागेल ? वापरकर्त्यांना स्वतःहून कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. हे सर्व बदल तुमच्या युपीआय ॲपमध्ये आपोआप लागू होतील.