पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे सचिन हा मूळचा एका शेतकरी कुटुंबातील. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात काही वर्षं मुंबईत घालवली, पण त्यांच्या मनात मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न होतं. गावातच काहीतरी उद्योग करायचा असं त्यांनी ठरवलं होतं.
संघर्षाची सुरुवात
२०१८ मध्ये त्यांनी गावात लघुउद्योग – मसाल्याचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरगुती पद्धतीने उत्पादन सुरू केलं, पण बाजारात टिकण्यासाठी यंत्रसामग्री, पॅकिंग सुविधा आणि वितरणासाठी अधिक गुंतवणूक आवश्यक होती. हाताशी असलेले थोडे पैसे संपले आणि कर्ज घेणे हा पर्याय होता. जनता बँकेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अर्थात PMEGP योजनेची त्यांना माहिती मिळाली. सचिनला संकोच वाटत होता. आपण कसे काय कर्जप्रक्रिया पूर्ण करु शकणार, मला जमेल की नाही, मी करु शकेन का असे अनेक प्रश्न त्याच्या मनात होते. पण एकदा प्रयत्न करुन तर बघू असा विचार करुन तो बँकेत गेला.
मात्र त्यानंतर त्याचे विचार आणि व्यवसायाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. बँकेतील अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पध्दतीने त्याला योजनेची माहिती दिली. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याला काय करता येईल याचे विविध मार्ग सांगितले. हिशेब, योग्य वेळी गुंतवणूक, प्रकल्प अहवाल याबद्दल अगदी मोठ्या भावाप्रमाणे समजावून सांगितले. सचिनला खूप आधार वाटला आणि त्यांने कर्जासाठीची प्रक्रिया पूर्ण केली.
"लघुउद्योग कर्ज योजना" अंतर्गत त्यांना ३ लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं. कर्जासोबतच त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षणाची माहिती आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही देण्यात आली.
प्रगतीचा मार्ग
या कर्जाच्या मदतीने त्यांनी आवश्यक मशीन खरेदी केली, दर्जेदार पॅकिंग सुरू केलं आणि स्थानिक दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरू केला. आज त्यांच्या “सचिन स्पायसेस” या ब्रँडखाली १५ पेक्षा अधिक मसाले विकले जातात. ५ स्थानिक तरुणांना त्यांनी रोजगारही दिला आहे.
सचिन सांगतो, "संकटाच्या काळात साथ देणारी बँक म्हणजे खरी आपली बँक. जनता सहकारी बँकेने मला फक्त कर्ज दिलं नाही, तर आत्मविश्वास दिला."
अशा प्रकारे तरुणांना मदतीसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती उपक्रम मदतीला तयार असतो.