आधुनिक युगातही पारंपरिक पेमेंटच्या पर्यायांची उपयुक्तता...

आपल्याला दैनंदिन जीवनात व व्यवहारात वरचेवर विविध प्रकारचे पेमेंट विविध कारणासाठी करावे लागते. यासाठी अनेक पर्याय असून आपण आपल्याला माहित असलेले व सोयीचे पर्याय वापरात असतो. आजकाल पेमेंटचे अनेकविध नवीन पर्याय उपलब्ध असून केवळ आपले अज्ञान व त्यापोटी असलेली भीती यामुळे अगदी सुलभ व उपयुक्त असे पर्याय आपण वापरत नसल्याचे दिसून येते.