आदित्य चांगल्या मार्काने इंजिनिअरिंगची डिग्री पास झाला. गावातून एअरोस्पेस क्षेत्रात इंजिनिअर झालेला तो पहिलाच मुलगा होता. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. मात्र घरची परिस्थिती पाहता ते कितपत शक्य होईल. ते त्याला माहित नव्हते. त्याला सिंगापूरला जाऊन पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती.
कॉलेजमध्येही त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कॉलेजमधील वार्षिक कार्यक्रमांत त्याचा सत्कार झाला. तेथील एका उपक्रमाचे जनता बँकेने प्रायोजकत्व घेतले होते. तेव्हा आदित्यला जनता बँकेच्या शैक्षणिक कर्जयोजनेबद्दलची माहिती मिळाली.
जनता एज्युफ्लेक्स कर्ज योजना
देशांतर्गत शिक्षणासाठी – रु. ५० लाख*
परदेशातील शिक्षणासाठी - रु १ कोटीपर्यंत*
आकर्षक व्याजदर
त्वरीत मंजुरी
आदित्यने बँकेशी संपर्क केला आणि त्याला या योजनेचा फायदा झाला. आदित्या आता सिंगापूलमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. आपल्या गावातील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या भागातून निघणाऱ्या एका पेपरमध्या आपले विचार आदित्य लिहून पाठवतो आणि ते विचार छापले जातात.
*********************
शैक्षणिक कर्ज घेताना कोणता विचार करावा -
परदेशात जायचं म्हणून किंवा अन्य कोणी ॲडमिशन घेतली म्हणून कोर्स निवडू नका. जर खरंच तुम्हाला तो अभ्यासक्रम शिकण्यात स्वारस्य असेल तरच तो कोर्स निवडा व नंतरच शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करा.
आपण बऱ्याच मोठमोठी कॉलेजेस आणि विद्यापीठांची नावे ऐकून असतो. मात्र प्रवेश निश्चित करण्याअगोदर कॉलेजच्या प्लेसमेंट धोरणाविषयी पूर्व माहिती असणे आवश्यक आहे.
प्लेसमेंटची सुविधा चांगली असल्यास चांगली नोकरी मिळणे व कर्ज परतफेडीचं नियोजन करणे सोयीचे होते.
जाहिरातीतल्या “१००% प्लेसमेंट असिस्टंस” आणि “१००% प्लेसमेंट गॅरंटी” या दोन संकल्पना समजून घ्या. उगाचच प्लेसमेंट शब्द आहे, म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी मिळेलच असं नाही.
प्लेसमेंट असिस्टंस म्हणजे फक्त नोकरीसाठी मदत असा अर्थ होतो. यामध्ये संस्था नोकरी मिळवून देत नाही.
– महत्वाच्या गोष्टी (Education Loan:Important points)
जेव्हा तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करता त्यावेळी स्वतः बँकेत जाऊन बँकेच्या अटी व पात्रतेच्या नियमांची माहिती घेणे आवश्यक असते.
तुम्ही निवडलेला कोर्स ,कॉलेज आणि विद्यापीठ ,तिथे मिळणाऱ्या प्लेसमेंट्स किंवा नोकरीच्या संधी या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही जागरूक आहात, याचीही माहिती बँकेला देणे आवश्यक असते.
सामान्यत: शैक्षणिक कर्जामध्ये तुमचे शिक्षण शुल्क, वसतिगृह, लायब्ररी फी, पुस्तके व कोर्स मटेरियल अशा विविध खर्चाचा समावेश असतो.
काही बँका विशिष्ट रकमेपर्यंत वाहन खरेदी, विमा संरक्षण, विनामूल्य क्रेडिट कार्ड इत्यादींसारख्या अतिरिक्त सुविधादेखील प्रदान करतात
अर्जदाराने सर्व अटी व शर्तींचे पालन केलेले असल्यास, अर्ज केल्यानंतर साधारणतः १५ दिवसांच्या आत कर्ज मंजूर केले जाते.
कर्ज घेताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले.
परतफेडीचे नियोजन? (Repayment Strategy)
मोरॅटोरिअम कालावधी’ नंतर म्हणजेच अभ्यास संपल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर, जे आधी असेल त्यापासून परतफेड सुरू होते.
ईएमआय सुरू होण्यापूर्वी कर्जदाराकडे परतफेड करण्याचे धोरण असले पाहिजे.
विद्यार्थी कर्जदारांना अनेक सवलती मिळतात. या सवलती विद्यार्थ्यांवर येणारे परतफेडीचे ओझे कमी करण्यासाठी वापरल्या जाऊ शकते.
खर्च कमी करून बचतीस प्रारंभ करा.
बँक कोर्सच्या किंवा सेमेस्टरच्या शेवटी वितरणाच्या वेळेपासून व्याज आकारण्यास सुरू करते. ही रक्कम वाढतच राहते.
ईएमआय कमी करण्यासाठी कोर्स चालू असताना काही प्रमाणात रक्कम भरू शकता. या कालावधीत तुम्ही व्याज दिले, तर ईएमआय मोठ्या प्रमाणात कमी होईल.
आपले कर्ज प्रकरणाची सविस्तर माहिती घेणे फायद्याचे ठरते.