माझे बँक खाते, माझी जबाबदारी.. 'चिरंजीव ठेव योजना'

JSB Career Blog    09-Nov-2023
|

Chiranjeev

रंजना आज नाचतच शाळेतून आली. ती अतिशय आनंदात होती. “आई, मला आज खूप भारी वाटतं. मी स्वत: बँकेत जावून माझे पैसे काढले आणि शाळतील परिक्षेची फी भरली”
 
“अरे वा...!!बँकेचे व्यवहार कसे करायचे हे कळले तर” आई कौतुकाने म्हणाली
 
“अगं, सुरेश काकांनी मला शिकवले सगळे आणि बाबांनी माझे खाते जनता सहकारी बँकेत उघडून दिले. त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहारांची माहिती मला मिळाली.” रंजना म्हणाली.
 
सुरेश काकांनी काही दिवसांपुर्वी जनता सहकारी बँकेच्या चिरंजीव ठेव योजने पैसे गुंतवले होते. १४ वर्षांवरील ते १८ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी ही योजना आहे. विद्यार्थी आपल्या शाळेचे शुल्क, ट्युशन फी इतर शाळेच्या खर्चाची तरतूद विद्यार्थी स्वत:च्या सहीने करु शकतात.
 
“हो...गं! चिरंजीव ठेव योजनेद्वारे आपण पैसे गुंतवले आहेत. यामुळे तुला किती कॉन्फिडंस आलाय. तुझे व्यवहार स्वत:च्या सहीने करता येत असल्याने तुझे आर्थिक गरजा तूच पूर्ण करतेस. शहाणी झालीएस गं माझी बाई...” आई कौतुकाने म्हणाली.
 
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सहीने पैसे काढणे आणि शाळेचे शुल्क भरणे ही आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे.
 
विद्यार्थी वर्गाने करावयाची गुंतवणूक :
 
आजच्या धकाधकीच्या काळात आयुष्य फारच अस्थिर झालं आहे. नाही म्हटलं तरीही भविष्याचा विचार करावा लागतोच. त्यातच विविध समाज माध्यमांमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे आर्थिक साक्षरता सर्वदूर पोहोचत आहे. आजचे जवळपास प्रत्येक कुटुंब एक अपत्य केंद्रित असल्याने सर्वच आई वडील आपल्या अपत्याच्या भविष्याची आर्थिक तरतूद करून ठेवण्यासाठी धडपड करतात.
 
नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करता आजच्या विद्यार्थ्यांनी आणि भविष्यातील देशाच्या नागरिकांनी आर्थिक धडे गिरवायला सुरुवात करतील अशी अपेक्षा करूया. आजच्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच आर्थिक नियोजन करायला सुरुवात केली पाहिजे.
 
शालेय तसच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योग्य वेळी बचत आणि गुंतवणूक केल्यास त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. त्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे याविषयी जाणून घेऊ.
 
शाळेत जाताना आज बहुतांश पालक पॉकेटमनी देत असतात. मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसाला , परीक्षेच्या शेवटच्या दिवशी शाळेजवळच्या खाऊगल्लीत जावून किटी पार्टी करण्यासाठी पालकांकडून पैसे मिळत असतात. इथूनच शालेय जीवनातील व्यवहार समजायला सुरुवात होते.
 
महाविद्यालय हा जीवनाचा प्रारंभिक टप्पा असतो या काळात कॉलेज आणि मित्र-मैत्रिणींच्या चकचकीत दुनियेच्या प्रभावाखाली येऊन विद्यार्थी आपल्या महिन्याच्या बजेटच्या कितीतरी पट अधिक खर्च करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा त्यांना मोठ्या भावंडांकडून किंवा मित्रांकडून पैसे घ्यावे लागतात. महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकतात हे जाणून घेऊया.
बजेटमध्ये खर्च करा
 
बजेटनुसार आपल्या खर्चाचे नियोजन करणे हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बाब आहे. यामुळे वैयक्तिक खर्चाच्या गोष्टी हाताळण्याचे कौशल्य आत्मसात होते. तुमचे स्वतःचे बजेट ठरवताना तुमच्या खर्चाची यादी करा आणि महिन्याच्या शेवटी त्याची पडताळणी करा.
अतिरिक्त खर्चावर बंधन
 
विद्यार्थ्यांनी नेहमी अतिरिक्त होणाऱ्या खर्चाकडे लक्ष द्यायला हवे. इतर विद्यार्थ्यांच्या प्रभावाखाली, आपल्या बजेटची मर्यादा ओलांडू नका. अनावश्यक खर्च थांबवून आपल्या जीवनावश्यक गोष्टींवर खर्च करा.
 
खर्च मर्यादेचे बंधन असलेले डेबिट कार्ड वापरा. कोणत्याही स्वरूपाचे पेमेंट करायचे असल्यास विलंब शुल्क आणि अतिरिक्त शुल्क टाळा. शक्य तिथे कॅशबॅक आणि डिस्काउंटसारख्या सुविधांचा लाभ घ्या.
बचत आणि गुंतवणूक महत्वाची
 
विद्यार्थी दशेत असल्यापासूनच आपल्याला पालकांकडून मिळणाऱ्या ठरावीक रकमेचा खर्च अतिशय काटकसरीने करावा. त्यातून काही रकमेची बचत करण्याची सवय लावा जेणेकरून तुमच्या अडचणीच्यावेळी ती कामी येईल. त्यासोबतच बचतीची रक्कम आरडी, म्युच्युअल फंड, पोस्टाच्या योजना, मुदत ठेवी अशा कोणत्याही योग्य ठिकाणी गुंतवावी.
 
विद्यार्थ्यांच्या सवलतीचा लाभ घ्या
 
बाजारात अशा अनेक सेवा आहेत ज्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना प्रवास तिकीट सवलत, ओटीटी सबस्क्रिप्शन, डायनिंग आऊट, पुस्तके इत्यादींवर विशेष सवलत मिळते. अशा सवलतींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. हे तुम्हाला तुमच्या बजेटच्या मर्यादेत राहून तुमच्या मोकळ्या वेळेचा तसेच मनोरंजनाचा आनंद घेण्यास मदत करते. विद्यार्थ्यांच्या सवलतीतून वाचलेल्या पैशामुळे तुम्ही अधिक बचत करू शकाल.
 
आपल्या उत्पन्नाची नोंद ठेवण्यासाठी, तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
 
  • आपल्या पालकांकडून किंवा शिक्षकांकडून आपल्या उत्पन्नाबद्दल विचारा
  • आपल्या जेवण, प्रवास, कपडे, आणि इतर खर्चांची नोंद ठेवा
  • आपल्या खर्चाचे वर्गीकरण करा
आपल्या खर्चाचे वर्गीकरण केल्याने आपल्याला आपल्या खर्चाचा अंदाज लावण्यास मदत होईल. आपण आपला खर्च खालील प्रकारांमध्ये वर्गीकृत करू शकता:
 
आवश्यक खर्च: हे असे खर्च आहेत जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत, जसे की अन्न, कपडे, आणि निवारा.
 
इच्छित खर्च: हे असे खर्च आहेत जे आपल्याला आवश्यक नाहीत, परंतु आपल्याला आवडतात, जसे की मनोरंजन, आणि फॅशन.
 
आपल्या खर्चात कपात करा
 
आपल्या खर्चात कपात केल्याने आपल्याला अधिक बचत करण्यास मदत होईल. आपण खालील गोष्टी करून आपल्या खर्चात कपात करू शकता:
 
आवश्यक खर्च कमी करा: आपण आपल्या आवश्यक खर्चात कपात करण्यासाठी काही युक्त्या करू शकता, जसे की कमी किमतीच्या उत्पादनांचे वापरणे, किंवा कमी लांबीच्या प्रवासाची योजना करणे.
 
इच्छित खर्च कमी करा: आपण आपल्या इच्छित खर्चात कपात करण्यासाठी काही युक्त्या करू शकता, जसे की वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी त्यांची तुलना करणे, किंवा वस्तू दुसऱ्यांदा वापरणे.
 
बचत करा
 
आपल्या उत्पन्नातील काही भाग बचतीसाठी ठेवणे महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक नियोजन ही एक महत्त्वाची सवय आहे जी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगली आर्थिक पाया निर्माण करण्यास मदत करेल.