आर्थिक साक्षरतेचा पाया – तरुणांसाठी बँकिंगमधून बचत आणि नियोजन

11 Apr 2025 18:32:55
 
Financial literacy
आजच्या डिजिटल युगात तरुणांनी केवळ करिअरमध्येच नव्हे, तर आर्थिक क्षेत्रातही सजग राहणं गरजेचं आहे. वेळेवर घेतलेले बचतीचे निर्णय आणि योग्य नियोजन तुम्हाला भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळवून देतात. यामध्ये भारतीय सहकारी बँकिंग प्रणाली एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो.
 
१. तरुणांनी आर्थिक बचत आणि नियोजन का करावे ?
एका गावात मनोहर नावाचा मुलगा राहत होता. आई-वडील दोघेही अतिशय कष्टाने बचत करुन पैशांची जुळवणी करत आणि मनोहरच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असत. ही परिस्थिती आणि आईवडिलांची तारांबळ त्याला दिसत होती आणि कष्टाची जाणीवही त्याला होती.
 
महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कॉलेजमधील एका सेमिनारमध्ये प्राध्यापकांनी ‘कमवा व शिका’ या योजनेची माहिती मिळाली. या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन मनोहरने कॉलेजनंतर एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबरचे मित्र फिरणे, चित्रपट पाहणे, पार्टी करणे अशा मजा करत असत; मात्र मनोहर काम करुन आपला खर्च भागवत असे. तसंच उरलेले पैसे आपल्या खात्यात जमा करत असे. ज्यामुळे त्याच्या पैशांची बचत होत असे. काम करताना गुंतवणूकीची आणि बचतीची सवय लागली. लवकर सुरुवात
केल्यास गुंतवणुकीचा 'कम्पाउंड इंटरेस्ट' चा फायदा अधिक मिळतो. छोट्या वयात सवयी लावल्यास पुढील जीवनात आर्थिक अडचणी कमी होतात.
 
स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
 
२. जनता सहकारी बँक – तुमचा आर्थिक भागीदार
काम करताना मनोहरने जनता सहकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती करुन घेतली आणि मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक केली. कमी सेवा शुल्क, सुलभ व्यवहार आणि आपुलकीची सेवा हे या बँकांचे वैशिष्ट्य.
 
३. जनता बँक तरुणांना कशी मदत करते ?
- झीरो बॅलन्स जनधन बचत खाते – विद्यार्थ्यांसाठी योग्य पर्याय.
- आवर्ती ठेवी (RD) – महिन्याच्या थोड्या रकमेपासून बचत सुरू करता येते.
- शैक्षणिक कर्जे – स्थानिक विद्यार्थी आणि पालकांसाठी सोप्या अटींवर.
- आर्थिक साक्षरता मोहीमा – महाविद्यालये, शाळा आणि गावांमध्ये कार्यशाळा.
 
४. तरुणांनी आजपासून सुरुवात कशी करावी?
-नजिकच्या जनता बँकेच्या शाखेत खाते उघडा.
-तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा – शिक्षण, प्रवास , आपत्कालीन निधी, इ.
-मासिक बजेट बनवा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.
-महिन्याला ५०० रुपये सुद्धा ठेवल्यास वर्षभरात चांगली रक्कम जमा होते.
-'कम्पाउंड इंटरेस्ट' म्हणजेच चक्रवाढ व्याज कसे काम करते हे समजून घ्या.
 
आर्थिक साक्षरतेची चळवळ हाती घेत मनोहरने आपला अनुभव इतर मित्रांसोबत शेअर केला. त्याच्याबरोबरचे अनेक मित्र बँकेशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांना बँकेबद्दल अदययावत माहिती मिळू लागली. भविष्यातही असेच जनता बँकेच्या सोबत राहण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. मनोहरने आपल्या मित्रांना मेसेज करुन सांगितले -
सहकारी बँकिंग ही केवळ एक आर्थिक सेवा नसून ती सामूहिक विकासाची चळवळ आहे. जर आपण लवकरच बचत आणि आर्थिक नियोजन सुरू केले, तर उज्ज्वल आणि स्थिर भविष्यासाठी आपण तयार राहू. चला तर मग, तरुणांनो पुढे येऊया, बचत आणि नियोजनाची 'हॅबिट' लावूया आणि जनता सहकारी बँकेच्या साथीने आर्थिकदृष्ट्या सक्षम भारत घडवूया!
Powered By Sangraha 9.0