महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024विकासाचे इंजिन आणि प्रगतीला वेग

JSB Financial Blog    27-Feb-2024
|

Maharashtra

राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सर्वप्रथम विधानभवन प्रांगणातील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
 
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ⁠11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे. याशिवाय, अयोध्येत रामजन्मभूमीत महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. जम्मू काश्मीर मध्येही महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
  • भारतातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भुसंपदान पूर्ण झालं आहे. सोलापूर तुळजापूर धाराशिव तेथे रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सूरू आहे. जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देइल. ही चौथी मार्गिका असणार आहे. जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम सरकारं देईल, ही चौथी मार्गिका असणार आहे. सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत.
 
  • महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे. मुलींना 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येईल.
  • संजय गांधी निराधार योजनेत 1000 वरुन 1500 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन केलं जाईल.
 
  • जानेवारी 2024 मध्ये दवोस येथे 19 कंपन्यांसोबत करार झाले आहेत, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
 
  • निर्यात वाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे. 'मेक इन इंडिया' धोरणांतर्गत 196 कोटी रुपये निवेदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
 
  • शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषीपंप योजना राबवण्यात येणार, 8 लाख 50 हजार नवीन कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव सरकाराला देण्यात आला आहे. येत्या 3 वर्षात 155 प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येईल त्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गरज आहे.
 
  • 40 टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार आहे. 37 हजार आंगणवाडींना सौर उर्जा दिली जाणार आहे. एक लाख महिलांना रोजगार दिला जाईल. आंगणवाडी सेविकांची 14 लाख पद भरण्यात आली.
 
  • खेळाडूंसाठी 'मिशन लक्षवेध' योजनेअंतर्गत राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर क्रिडा उत्कृष्टता केंद्र, जिल्हा स्तरावर क्रिडा प्रतिभा विकास केंद्र अशी खेळाडंसाठी त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.