QR Code म्हणजे काय रे भाऊ?

Financial Blog    31-Aug-2019
|

                        



 

 

भारतात नोटबंदी जाहीर होण्याआधी बहुतांश व्यवहार हे रोख पद्धतीनेच चालत होते. पण त्यानंतर अचानक देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली. इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस/एनईएफटी ही ऑनलाईन व्यवहारांची माध्यमं आधीपासून उपलब्ध होती खरी पण त्याचा फार मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत नव्हता. नोटबंदी झाल्यावर व मोदींनी डिजिटल इंडिया हे कॅम्पेन सुरु केल्यानंतर 'भीम', 'पेटीएम', 'फोन पे', 'जीपे' यांसारखे वॅलेट मोठ्याप्रमाणात बाजारात येऊ लागले. आधी मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून या वॉलेटद्वारे व्यवहार होत होते परंतु त्याची लोकप्रियता वाढल्यानंतर QR Code ची पद्धत व्यवहारांसाठी अधिक अवलंबली जाऊ लागली. आता अगदी फुल, भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉल मध्ये सगळीकडे कॅश काउंटरवर QR Code डिसप्ले केलेला असतो. याबाबत बऱ्यापैकी आता जागरूकता झाली आहे, पण तरीही अजून मधूनच कधीतरी हे QR Code म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न कानावर पडतोच. ज्यांना अजूनही QR Code विषयीची माहिती नाही त्या तमाम नागरिकांसाठी हे विशेष लेख...
 
सध्याचं युग हे डिजिटल आहे. आधी कोणताही व्यवहार करताना २-३ रुपये सुट्टे देण्या घेण्यावरून भांडणं होत होती. आता मात्र QR Code च्या सेवेमुळे ही अडचण दूर होण्यास मदत झाली आहे. आता तुम्ही कोणत्याही छोट्या दुकानात, पानपट्टीवर, चहाच्या अमृततुल्य मध्ये किंवा अगदी मोठ्या मॉल मध्ये जरी गेलात तरी तुम्हाला समोर QR Code लावलेला दिसतो. आता आपण जरा QR Code कधी व केव्हा सुरु झालं? ते नेमकं कसं काम करतं? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? QR Code कोणाकोणाला मिळू शकतो व कसा? त्याचे फायदे काय काय आहेत?
 
QR Code ची सुरुवात

 

Quick Response Code asa QR Code चा फुलफॉर्म आहे. QR Code चं तंत्रज्ञान १९९४ मध्ये डेन्सो वेव्हमधून तयार झाले. QR Code प्रथम जपानमधील कंपन्यांद्वारे वापरला गेला होता, हळूहळू त्याचा विस्तार होत गेला व आता QR Code प्रस्थ संपूर्ण देशभर पसरलं आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे QR Codeची सेवा घेणं अधिक सोपं झाल्याचं लक्षात येतं. QR Code चे तंत्रज्ञान बाजारात येण्याआधी 'बारकोड' पद्धत अस्तित्वात होती. त्यांनतर जस जस जग क्रांती करत गेलं तशा तांत्रिक बाबीही अद्ययावत होत गेल्या. QR Code 'बारकोड' पेक्षा शंभर पट अधिक माहिती प्रदान करू शकतात. अक्षरे, संख्या, ग्राफिक्स आणि ऑडिओ किंवा व्हिडिओ आदींचा QR Code जनरेट करता येतो. डेटाचे विपुल प्रमाणात एन्कोडिंग करता येणं हे QR Code चं वैशिष्टय आहे. QR Code स्मार्टफोनच्या सहाय्याने कोणत्याही दिशेने 360 अंशांसाठी स्कॅन करता येतो. QR Code रीड करण्यासाठी अँड्रॉईड वापरकर्त्यानी 'क्यूआर कोड रीडर' तर आयफोन धारकांनी 'द्रुत स्कॅन' हे App डाउनलोड करून घ्यावेत. प्ले स्टोअर वर हे दोन्ही App नि: शुल्क उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त इतरही काही App चे पर्याय याठिकाणी तुम्हाला मिळू शकतात.
 

 QR Code चा वापर

गेल्या काही वर्षांत QR Code आपल्या वेबसाइट, फेसबुक, ट्विटर किंवा अन्य सोशल मीडियाच्या पेजेसचे आता QR Code बनवता येतात व त्याद्वारे मार्केटिंग करता येते. पण याखेरीज सध्या बँकिंग क्षेत्रात QR Code चा वापर सर्वाधिक प्रमाणात होताना दिसतोय. त्याचे कारणही तसेच आहे. देश डिजिटल व्यवहारांना प्राध्यान अधिक देत असल्याचे लक्षात आल्यावर पेटीएम, जीपे यांसारखे प्रायव्हेट वॉलेट बाजारात येऊ लागले तर दुसरीकडे केंद्र सरकार तर्फे भीम, युपीआय, भारत बिल पे यांसारख्या App मुळे देखील डिजिटल व्यवहारांच्या संख्येला गती मिळाली. आता तर सर्व राष्ट्रीय तसेच काही सहकारी बँकांनीही व्यवहार व इतर बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने स्वतःचे App डेव्हलप केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व App भीम किंवा युपीआय लाईव्ह असल्याने QR Code स्कॅन करून कोणत्याही प्रकारचे पेमेंट करणं ग्राहकांना शक्य होतं. हल्ली सर्व छोट्या मोठ्या खरेदी-विक्रीच्या ठिकाणी कॅश काउंटरवर पेमेंटसाठी QR Code डिसप्ले केल्याचे दिसून येते. हे QR Code संबंधित व्यावसायिकाने त्याच्या बँकेकडून किंवा भीम, युपीआय द्वारे जनरेट करून घेतलेले असतात. जनता सहकारी बँकेकडे ही अद्ययावत सुविधा उपलब्ध असून आत्तापर्यंत त्याचा अनेक व्यावसायिकांनी फायदा घेतला आहे.
 
 
जनता बँक UPI QR Code

 

आज पुणे तसेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत खातेदार व्यावसायिकांना जनता बँकेने QR Code जनरेट करून दिले आहेत. यामाध्यमातून त्यांचा व्यवसाय कॅशलेसच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. QR Code ची सुविधा जनता बँकेच्या बँकेचे ‘BHIM JET PAY’ या App वर उपलब्ध आहे. हे App गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेच. सदर App वापरण्याकरता खातेदाराांकडे एटीएम कार्ड असणे तसेच एसएमएस रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. या App द्वारे Virtual ID तयार करून लिंक केलेल्या खात्यामध्ये पैसे स्वीकरता व पाठवता येतात. तसेच या App मधून क्यूआर कोड जनरेट करून देखील पैसे खात्यामध्ये स्वीकरणे सहज शक्य आहे. मात्र ज्या खातेदारांकडे एटीएम कार्ड नाही अशा खातेदाराांना यूपीआय App वरून व्यवहार करणे शक्य नसल्याने अशा खातेदारांना 'UPI QR Code' जनरेट करून देण्याची सुविधा जनता सहकारी बँकेने केलेली आहे. (उदा. :व्यापारी, दुकानदार, हॉसिंग सोसायटी, ट्रस्ट, शैक्षणिक संस्था, देवस्थाने असे चालु ठेव/बचत ठेव खातेदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.) आज अनेक ठिकाणी आपल्याला ज्याप्रमाणे Paytm, Bhim, Gpay चे QR Code पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे ‘BHIM Jet Pay’ चा 'QR Code' जनरेट करून जनता सहकारी बँकेतर्फे ग्राहकांना दिला जातो.

 
कोण वापरू शकतं ही सुविधा?

 

 

जनता सहकारी बँकेच्या सर्व बचत व चालू ठेव खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. व्यापारी, दुकानदार या सुविधेचा वापर करून रोख विरहित व्यवहार करू शकतात. तसेच हॉसिंग सोसायटी युपीआय QR Code चा वापर करून सोसायटी मेंटेनन्स स्वीकारू शकतात. ट्रस्ट, शैक्षणिक संस्था, देवस्थाने देखील QR Code द्वारे विविध प्रकारची शुल्क, देणग्या विनासायास त्वरित आपल्या खात्यामध्ये जमा करून घेऊ शकतात. विशेष म्हणजे ही सुविधा अद्ययावत तर आहेच पण त्याचबरोबर ती किफायतशीर व सुरक्षित देखील आहे! QR Code सुविधेचा वापर फक्त पैसे खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी केला जातो. युपीआय QR Code वापरून खातेदार खात्या मधून रक्कम वर्ग करू शकणार नाहीत. ही सुविधा वापरण्याकरिता खातेदाराकडे एटीएम कार्ड असण्याची आवश्यकता नाही.

 
QR Code द्वारे पैसे स्वीकारण्याचे पर्याय...

जनता बँकेने जनरेट करून दिलेला QR Code संबंधित खातेदार काउंटर, वेबसाईट, न्यूजलेटर, मॅगझीन आदींवर वर डिसप्ले करू शकतात व त्याद्वारे पेमेंट स्वीकारू शकतील. हल्ली ज्याप्रमाणे प्रत्येक लाईट बिल वर QR Code दिलेला असतो त्याचप्रमाणे खातेदारांकडे QR Code बिलावर छापण्याचा देखील पर्याय उपलब्ध असतो (उदा. : दुधबील, पेपर बील इ.). BHIM Jet Pay, BHIM, Google Pay अथवा इतर कोणत्याही UPI App मधून QR Code स्कॅन करून व्यवहार पूर्ण करता येतात.

 
UPI QR Code कितपत सुरक्षित आहे?
जनता बँकेच्या UPI QR Code सुविधेचा वापर करून केलेले व्यवहार पूर्णतः सुरक्षित आहेत. व्यवहार करताना बेनेफिशअरीला स्वतःच्या बँकेचे तपशील (उदा. खाते क्रमाांक, आयएफएससी कोड इ.) पेमेंट करणाऱ्यांशी शेअर करण्याची गरज नाही. व्यवहार पूर्ण झाल्यानांतर त्या संबंधीचा 'एसएमएस' देखील खातेदारास पाठववला जातो. व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाल्याची खात्री करण्याकरिता खातेदारास 'एसएमएस' द्वारे आलेला १२ डीजीट युनिक RRN (Retrieval Reference Number) व पेमेंट करणाऱ्या व्यक्तीस आलेला RRN हा एकच असल्याचे पहावे लागेल.
 
व्यवहार सुरु करण्याआधी याची खातरजमा करा...
UPI QR Code सुविधा वापरणाऱ्या खातेदारांनी जो QR Code खात्यास लिंक केलेला आहे, तोच QR Code व्यवहार करताना वापरला जात आहे ना; याची खात्री करणे गरजेचे आहे. तसेच रोजच्या रोज Reconciliation करणे देखील गरजेचे आहे.
 
खातेदारासाठी UPI QR Code ची वैशिष्ट्ये :

१) खातेदारास व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही.
२) खातेदारास मासिक अथवा वार्षिक शुल्क नाही.
३) पैसे स्वीकारताना स्वाईप मशीनची आवश्यकता नाही.
४) खातेदाराकडे स्मार्ट फोन असण्याची आवश्यकता नाही.
५) मोबाईल क्रमाांक शेअर करण्याची गरज नाही.
६) पेमेंट रिक्वेस्ट पाठवायची आवश्यकता नाही.
७) पैसे तात्काळ खात्यामध्ये जमा होण्याची सुविधा.

 

UPI QR Code मिळावा आणि कॅशलेस व्यवहार करा!
QR Code विषयीची इत्यंभूत माहिती तुम्हाला या लेखातून मिळाली आहे. तसेच बँकेच्या वतीने QR Code जनरेट कसा केला जातो व त्याचा व्यवहारामध्ये किती फायदा होतो हे देखील आपण या लेखातून जाणून घेतलं आहे. मग आता अधिक वाट पाहू नका, तुमच्या व्यवहाराला कॅशलेसचे स्वरूप देण्यासाठी आजच जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेस भेट देऊन फॉर्म भरा व या अद्ययावत सेवेचा लाभही घ्या!