ग्राहकांसाठी सूचना

Janata Sahakari Banlk Ltd., Pune    21-Sep-2018
Total Views |

 Interest Rate Changes :-

चालू आर्थिक वर्षातील दोनही पत धोरणात रिझर्व्ह  बँक ऑफ इंडिया ने रेपो रेट मध्ये एकूण ०.५०% ने वाढ केली आहे. भारतीय आर्थिक क्षेत्रातील वाढीव व्याजदराचे रिझर्व्ह  बँक ऑफ इंडियाने संकेत दिले असून बहुतांश बँकांनी देखील व्याजदरात वाढ केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या बँकेने दि. १६/०९/२०१८ पासून कर्ज व्याजदरात ०.१५% एवढी नाममात्र वाढ केलेली आहे.

बँकेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या नाममात्र व्याजदर वाढीचे निर्णयास आपण सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी विनंती आहे. बदललेल्या व्याजदरानुसार माहे सप्टेंबर २०१८ अखेर व त्यापुढे व्याज आकारणी केली जाईल याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती साठी आपल्या शाखेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.

                                                मुख्य कार्यकारी अधिकारी

                                            मा. संचालक मंडळ आदेशानुसार