Date: |
विमा ही आपल्या आयुष्यातील किती महत्त्वाची बाब आहे, याची माहिती देणारा लेख आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. या लेखाचे औचित्य असे आहे की, जनता सहकारी बँकेतर्फे 29 ऑगस्टपर्यंत 'Investment Day' हा आगळा-वेगळा उपक्रम सर्व शाखांमधून राबविला जात आहे. त्यामुळेच आपल्या सर्वांना विम्याची, यामध्ये सहभागी असणाऱ्या या विविध संस्था व नेमका हा उपक्रम काय आहे याची माहिती व्हावी यासाठी हा लेख.
सध्याच्या काळात संरक्षण हे प्रत्येक पावलावर गरजेचे आहे. नुकताच रक्षाबंधन सण आपण उत्साहात साजरा केला. पूर्वीच्या काळी भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेत तसेच त्यांच्या रक्षणाची जबाबदारीदेखील उचलत. पण काळ बदलत गेला आणि घरापासून दूर राहणाऱ्या या प्रत्येकाला स्व-संरक्षणाची जबाबदारी उचलणे गरजेचे झाले. त्यातही रस्त्याने आपण कितीही सरळ व सर्व नियमांचे पालन करून चाललो तरी दुसऱ्या या व्यक्तीकडून धडक बसू शकते हे नेहमीच लक्षात ठेवावे लागते. त्यामुळेच आपण कर्ज काढतानाही व्यक्तीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत का असेना पण विमा योजना घेतोच.
अलीकडे तर मोबाईल खरेदी केला तरी त्याचा विमा उतरवणे गरजेचे समजले जाते. मग घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी विमा योजना घेताना आपण पुर्नविचार का करतो? जसे प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाऊंट असणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्याला योग्य अशी विमा पॉलिसी घेतली पाहिजे. कारण सध्या जितकी स्पर्धा आहे तितकीच आव्हानेही. कधी कोणता आजार किंवा आरोग्याचा प्रश्न उद्भवेल आणि आपल्याला मोठा खर्च समोर येईल हे सांगता येत नाही. त्यामुळेच विमा संरक्षित आयुष्य जगणे हे टेंशन फ्री आयुष्यासाठी गरजेचे आहेत.
समजून घेऊ या लाइफ इन्शुरन्स या योजनेबद्दल.
लाइफ इन्शुरन्स का व कोणी घ्यावे याविषयी अनेक शक्यता आपण वाचलेल्या आणि कोणीतरी सांगितलेल्या ऐकलेल्या असतात. एक खात्रीने सांगता येते की, प्रत्येक कुटुंबात अनेक जण कमावते असले तर घराच्या खर्चासाठी हे कमावते घटक एकत्रितरित्या अचानक आलेल्या खर्चासाठी नियोजन करू शकतात. पण एकटीच व्यक्ती कमावती असेल तर त्यांच्यावर सगळा ताण येतो. त्यामुळे लाइफ इन्शुरन्स घेतला असेल तर एकट्या कमावत्या व्यक्तीवर तितकासा ताण येत नाही. जर अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे कमावती व्यक्ती दगावल्यास अशा परिस्थितीत लाइफ इन्शुरन्स कुटुंबाच्या भवितव्यासाठी उपयोगी ठरते. लाइफ इन्शुरन्स घेताना ग्राहक काही उमेदवार निवडू शकतो. लाइफ इन्शुरन्सचा फायदा संपूर्ण कुटुंबासाठी होतो. यामध्ये आर्थिक तोटा किंवा आर्थिक अडचणींच्या काळातही सहाय्य मिळू शकते. लाइफ इन्शुरन्स योजना आजीवनही आपल्यासाठी सहाय्यकारी ठरते.
जनता सहकारी बँकेने लाइफ इन्शुरन्स संदर्भात बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स सोबत आमच्या खातेदारांसाठी अनेक योजना उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये प्रोटेक्शन सोल्युशन व निरोगी आयुष्यासाठी हेल्थ व वेलनेस सोल्युशन्स अशा दोन स्वतंत्र पद्धतीने योजना उपलब्ध आहेत.
जनता सहकारी बँकेचे विश्वासपात्र भागिदार द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी अनेक क्षेत्रांसाठी विमा संरक्षण योजना पुरवते. यामध्ये पर्सनल, कमर्शिअल, इंडस्ट्रिअल, लायबेलिटी व सोशल अशा पाच विविध योजनांतर्गंत विविध विमा संरक्षण दिले जाते. आपण घेतलेल्या कर्जासाठीदेखील विमा संरक्षण देण्याची जबाबदारी द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने स्वीकारली आहे. तसेच घर, कार, दुकान, आग लागल्याने होणारे नुकसान व मशिन्ससाठी आवश्यक विमा संरक्षण देण्यासाठीही स्वतंत्र योजना न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीद्वारे उपलब्ध आहेत. याशिवाय सर्वपरिचित असलेल्या एलआयसी लाईफ इन्शुरन्सशीसुद्धा बँकेने टायअप केलेला आहे.
आरोग्य विमा का व कोणी घ्यावा?
अलीकडे सर्वच जण आरोग्याबद्दल फार जागरुक असतात. आरोग्याच्या कारणाने आरोग्य विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या या कुटुंबासाठी मेडिकल व वैद्यकीय खर्चासाठी संबंधित कंपनीकडून सहाय्य मिळते. आरोग्य विमा घेताना आपण कुटुंबासाठी या विमा योजनेंतर्गत कव्हर मिळणार आहे का याची खातरजमा करणे गरजेचे ठरते. पण आजारी पडल्यावर किंवा दगावल्यावरच आरोग्य विमा योजनेचा लाभ घेता येतो असे नाही तर आरोग्यदायी जीवनासाठी आरोग्य विमा योजनेंतर्गत लाभ मिळू शकतो. आरोग्य विमा घेताना एक वर्षाकरिता पॉलिसी घेता येते. एक वर्षाचा कालावधी संपत आल्यावर नव्या वर्षात ही पॉलिसी नव्याने सुरू करावी लागते.
रेलिगेअर हेल्थ इन्शुरन्स ही कंपनी फक्त तुमच्या आरोग्यासाठी विमा कव्हर देत नाही तर संपूर्ण कुटुंबाने दरवर्षी आरोग्य विषयक चाचण्या केल्या पाहिजेत यासाठी आग्रही आहे. रेलिगेअर हेल्थ इन्शरन्समार्फत विमा संरक्षण घेतल्यावर दरवर्षी संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विषयक चाचण्या पूर्णपणे मोफत असणार आहेत. इंटरनॅशनल ट्रॅवल इन्शुरन्स, तुमच्या गरजेनुसार आरोग्य विम्याकरिता स्वतंत्र विमा हप्ता देण्याची सुविधा खास जनता सहकारी बँकेच्या खातेदारांना गुंतवणूक दिवसानिमित्त रेलिगेअर देत आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याचा विचार करता दोन्ही योजना गरजेच्या आहेत. पण व्यक्तीनुसार गरजा बदलतात. त्यामुळे कोणत्या विमा योजनेचा विचार करायचा हे स्वतंत्रपणे ठरवता येते. शेवटी आयुष्यात येणाऱ्या या धोक्यांपासून सुरक्षित राहताना अचानक आलेल्या खर्चावर पूर्वनियोजनाने मात करता येते किंवा त्या समस्येची तीव्रता कमी करता येणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा व कुटुंबाचा विचार करताना दीर्घकालीन लाभ, आपल्या उत्पन्नानुसार व कौटुंबिक परिस्थितीनुसार योग्य विमा योजना नक्की घ्यावी.