https://www.janatabankpune.com/newsletter/20122016.aspx

नोटाबंदीनंतर देशभरातील ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये लक्षवेधी टक्केवारीने वाढ झाली आहे. आगामी काळात कॅशलेस बँकिंग ही एक गरज बनणार आहे. जनता सहकारी बँक देखील आपल्या ग्राहकांना कॅशलेस सेवा देण्यासाठी तत्पर आहे. कॅशलेस सेवेचे नेमके फायदे काय आहेत, जनता बँक कोणत्या माध्यमातून ही सेवा तुम्हाला देते याची माहिती देणारा हा व्हिडिओ क्लिक करा

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गेल्या सात दशकांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव-२०१६’ यंदा ७ ते ११ डिसेंबर दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जगभरात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष होते. पुण्यातील प्रतिष्ठेच्या या स्वर महोत्सवात ‘जनता सहकारी बँक, पुणे’ने यंदा प्रथमच अर्थपूर्ण सहभाग घेतला. या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या संपूर्ण महोत्सवाची झलक दाखविणारा व्हिडिओ क्लिक करा

जनता बँकेच्या डिपॉझिटरी सेलद्वारे ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएसएल’ यांच्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण सेवा ग्राहकांना दिल्या जातात. डीमॅट अकाऊंट सुरू करून तुमच्याकडे असणारे शेअर्स ऑनलाईन कसे ट्रान्सफर करता येतील, त्याचा नेमका फायदा काय आहे, ‘एनएसडीएल’ किंवा ‘सीडीएसएल’च्या ‘स्पिडी’ फॅसिलिटीचा काय उपयोग आदी गोष्टींची माहिती घेण्यासाठी खालील व्हिडिओ अवश्य पाहा...

‘अ‍ॅल्पिकेशन सपोर्टेड बाय ब्लॅक अमाऊंट’ (आसबा) हा शब्द आपल्याला ऐकून माहिती असेलच, विशेष करून शेअर मार्केटमधील लोकांना याबाबत अधिक माहिती असते. याच ‘आसबा’संदर्भाने जनता सहकारी बँक, पुणे नव्या कोण-कोणत्या सेवा देते व त्याचा नेमका उपयोग ग्राहकांना कसा होऊ शकतो; हे जाणून घेण्यासाठी पाहा खालील व्हिडिओ... क्लिक करा

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.