जनता सहकारी बँक व ग्राहक पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशाला गरज एका अर्थक्रांती’ची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अर्थतज्ज्ञ श्री. अनिल बोकील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी जनता बँकेचे अध्यक्ष श्री. अरविंद खळदकर, ग्राहक पेठेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. सूर्यकांत पाठक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅदग्रीकल्चरचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रशेखर चितळे, पुणे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष श्री. फत्तेचंद रांका, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फॅम) श्री. राजेश शहा, ज्येष्ठ पत्रकार श्री. यमाजी मालकर, श्री. रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री. खळदकर यांच्या हस्ते श्री. बोकील यांचा शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

या विशेष कार्यक्रमाचे वृत्त, तसेच श्री. बोकील यांनी विमुद्रीकरणाबाबत मांडलेले मुद्दे काही निवडक व्हिडिओमधूनही आम्ही न्यूजलेटरच्या माध्यमातून आपणासमोर सादर करीत आहोत.

https://www.youtube.com/watch?v=SB0TyYTZskU

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर सामान्यांच्या जिवावर बेतणारा निर्णय अशा शब्दांमध्ये विरोधकांडून टीकेची झोड उठवली गेली, पण एक अर्थतज्ज्ञ म्हणून नव्हे,

https://www.youtube.com/watch?v=14M8dyUmffM

विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशातील एकूण अर्थव्यवस्था अधिक गतीने बदलाच्या दिशेने वाटचाल करते आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून प्रत्येकालाच आज डिजिटल बँकिंगचा पर्याय आत्मसात करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तसे आवाहन देशवासीयांना केले आहे.

देशात होणार्याद या मोठ्या बदलासाठी जनता सहकारी बँक आधीपासूनच सज्ज आहे. आणखी वाचा

डिसेंबरमध्ये सेन्सेक्सच्या ३० हजारांच्या उद्दिष्टाचे आकडे जवळपास अनेत तज्ज्ञ, वित्तसंस्था, दलाल पेढ्यांमार्फत मांडले जात असतानाच सेन्सेक्स नोव्हेंबरमध्ये अगदी २६ हजारांच्याही खाली येऊन ठेपला. निफ्टीचा प्रवास ८ हजारांखाली झाला. खरंतर २०१६ अखेरपर्यंतचे मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचे ३० हजारांचे आकडे दृष्टिक्षेपात नाहीत, याची चाहूल बाजारात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या संवत्सर मुहूर्तालाच लागली होती. उलट दिवाळीतील टप्प्यापासून बाजार नोव्हेंबरपर्यंत खूपच दूर गेला. आणखी वाचा

Technical Support

E-newsletter Archives | E-newsletter FAQ | Technical Problems

जनता बँकेचे ई-न्युजलेटर घेउन येणार आहे आपल्यासाठी उपयुक्त माहितीचा खजिना. ते नियमित मिळण्यासाठी पुढील सूचनेनुसार करा.

Don't miss important updates from JSB Pune! Please add janatabankpune.com as a domain in your safe sender list.

Your Subscription

आम्हाला आशा आहे की ई-न्युजलेटर आपल्याला आवडले असेल. पण कुठल्याही कारणासाठी जर या ई-मेल वर आपल्याला ते नको असेल तर फक्त unsusbscribe या लिंकवर क्लिक करा.
We hope that you enjoyed reading this e-newsletter. However, if you would rather not receive JSB e-newsletters in the future, please click here to unsubscribe.